पं नेहरू ‘लोकशाहीचे प्रणेते व सामान्यांचे कैवारी’ होते – गोपाळदादा तिवारी

पुणे : गर्भ श्रीमंतीत वाढलेले पं नेहरू, इंदीराजी, राजीवजी ते सोनियाजी हे (नेहरू-गांधी) कुटुंबिय सातत्याने देशातील ‘लोकशाहीचे प्रणेते’ असून, विकासाभिमुख व सर्वसामान्यांशी नाळ जोपासणारे व गरीबांचे कैवारी ठरलेले आहेत…! त्यामुळे देश पातळीवरील मान्यताप्राप्त नेतृत्वे ही ‘राष्ट्रीय मानांकने’ ठरली आहेत.. “पं नेहरू व श्रीमती इंदीराजी” या देशाप्रती योगदान असलेल्या राष्ट्रीय मानांकनांचे पुतळे (स्मारके)’ ‘पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी’ ऊभारली जावीत.. लोकशाहीची जाणीव व प्रेरणा मिळण्यासाठी ती आवश्यक आहेत, असे प्रतिपादन राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष व काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांनी केले…

राजीव गांधी स्मारक समिती तर्फे पं नेहरू स्टेडीयम येथील त्यांचे अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले… तसेच पं नेहरू जयंती व बालदिनाचे निमित्त लहान मुलांना गुलाब पुष्प व खाऊ वाटप करण्यात आला.. या प्रसंगी समितीचे जेष्ठ सदस्य पुणे शहर काँग्रेस ऊपाध्यक्ष श्री सुर्यकांत मारणे, सुभाष थोरवे, आबा तरवडे, भोला वांजळे, सेवादलाचे हरीदास अडसुळ, सुरेश ऊकीरंडे, राजेश गेहलोत, महेश अंबिके, आशीश गुंजाळ, योगेश भोकरे, सलीम शेख, निसार खान, सेवादल संघटक सो आशा विधाते इ उपस्थित होते.. हरीदास अडसुळ यांनी आभार प्रदर्शन केले…

Leave a Reply

%d bloggers like this: