भारतीय जनता पार्टीचा प्रभाग 41 मधील स्नेहमेळावा संपन्न

पुणे : भारतीय जनता पार्टीचा प्रभाग 41 मधील स्नेहमेळावा संपन्न आज पार पडला. स्नेहमेळाव्यामध्ये दिवाळी फराळ व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हे आयोजन भाजपचे प्रभाग 41 मधील उपाध्यक्ष दीपक पालवे व प्रभाग 41 मधील भाजपचे सरचिटणीस अनिल मेमाने यांनी केले होते.

या कार्यक्रमास समृद्धी जक जील स्कूल चे संस्थापक सुशील भोईटे, माजी आमदार योगेश टिळेकर , माजी नगरसेवक रंजनाताई टिळेकर व  प्रभात 41 मधील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते.
हा कार्यक्रम प्रभात 41 मधील सुखसागर नगर येथील गंगोत्री हॉटेल यशस्वी सोसायटी जवळ पार पडला.

यावेळी दीपक पालवे म्हणाले,आज आमच्या प्रभाग 41 मधील भारतीय जनता पाटीचा प्रभाग 41 मधील स्नेहमेळावा पार पडत आहे.आमचा या कार्यक्रमातून पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भेटता यावे म्हणून आम्ही दिवाळी फराळ चे आयोजन केले आहे.

सुशील भोईटे म्हणाले, आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम करत असतो. कार्यकर्ते जपने हे पक्षाचे काम आहे.
आमचे माजी आमदार योगेश टिळेकर ह्यांना कार्यकर्त्यांची जाणीव आहे. कार्यकर्ते अडीअडचणीला येत असतात. कार्यकर्त्यांना व आम्हाला एकमेकांना भेटता यावे. म्हणून आम्ही आज  स्नेहमेळावा घेतला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: