हो स्वातंत्र्य भिकेतच मिळालं ; कंगना रनौटच्या व्यक्तव्याचे जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याकडून समर्थन

पुणे : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रनौटने केलेल्या ‘1947 साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती’ या वक्तव्या बद्दल तिच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. मात्र, आज जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या या विधानांचे समर्थन करत वादात उडी घेतली आहे.

अभिनेते विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आज ब्राह्मण महासंघाच्या वतीते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोखलेंनी हे विधान केल. यावेळी त्यांनी मोदींचे कौतुक केले. तसेच शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास बरं होईल असेही सांगितले.

विक्रम गोखले म्हणाले, कंगना जे म्हणाली ते खर आहे.  मी त्या वक्तव्याचे समर्थन करतो, देशाला कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, ते भिकेनेच मिळाले आहे. हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान नाही का? असे विचारले असता ते म्हणाले, हो हा स्वातंत्र्य वीरांचा अपमान आहे. पण ते स्वातंत्रवीर जेव्हा फासावर जात होते तेव्हा त्यांना कोणीही वाचवलं नाही. त्यावेळी राजकारणात असलेले अनेकजण फक्त बघत राहिले, असा गंभीर आरोपही विक्रम गोखले यांनी यावेळी केला.

शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास बरं होईल

महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना आणि भाजपला विश्वासाने मते दिली. पण त्यांनी राज्यातील जनतेचा अपमान केला आणि वेगळे झाले. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यास काहीच हरकत नव्हती. अजूनही वेळ गेलेली नाही. देशाला अवघड परिस्थितीतून बाहेर काढायच असेल तर त्यांनी एकत्र याव. देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवा राहिला पाहिजे. शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास बरं होईल, अशी अपेक्षाही विक्रम गोखले यांनी यावेळी व्यक्त केली.

मतपेटीसाठी राजकारणी दंगली घडवतात 

अमरावती येथे काल निर्माण झालेल्या दंगल सदृश्य परिस्थितीवर भाष्य करताना विक्रम गोखले म्हणाले, हिंदू – मुस्लिम, दलित – ब्राम्हण, दलित – मराठा दंगली या राजकारण्यांमुळेच घडतात. मतपेटीसाठी राजकारणीच या दंगली घडवतात.

Leave a Reply

%d bloggers like this: