केंद्रातील भाजप सरकारच्या महागाई विरोधात कॉंग्रेस पक्षाच्या जनजागरण अभियानाची सुरूवात
पुणे : केंद्रतील भाजप सरकारने केलेल्या महागाईच्या विरोधात अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या वतीने दि. १४ ते २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत देशात ”जनजागरण अभियान” आयोजित केले आहे. नेहरू स्टेडियम येथील पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने लोकमान्य टिळक पुतळा, मंडर्इ पर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस भाववाढीमुळे त्रस्त झालेल्या जनतेचे छायाचित्रांचे फलक घेवून, मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ”आज भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची १३२ वी जयंती आहे. देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. आज भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत सामान्य जनतेचे जगणे कठिण झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. कॉंग्रेसच्या राजवटीत स्थापन केलेले सरकारी संस्थांचे भाजप सरकार खाजगीकरण करीत आहे, या खाजगी करणाच्या नावाखाली अनेकांची नोकरी संपुष्टात आली आहे. देशात बेरोजगारी वाढत आहे. कॉंग्रेस पक्षाने आंदोलनामार्फत या भाववाढीकडे आणि इतर ज्वलंत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले, पुढच्या १५ दिवसात पुणे शहराच्या विविध वॉर्डात महागार्इच्या विरोधात जनजागरण करणार आहोत.
यानंतर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर कमल व्यवहारे यांचीही भाषणे झाली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चवधरी, दत्ता बहिरट, वीरेंद्र किराड, अमीर शेख, लता राजगुरू, मनीष आनंद, पुजा आनंद, नीता रजपूत, सोनाली मारणे, प्रकाश पवार, विशाल मलके, भूषण रानभरे, संगिता तिवारी, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, सचिन आडेकर, प्रवीण करपे, राजेंद्र भुतडा, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, शिलार रतनगिरी, अमित बागुल, बाळासाहेब अमराळे, प्रशांत सुरसे, किशोर वाघेला, नितीन परतानी आदींसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे व माजी आमदार दिप्ती चवधरी यांनी कॉंग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून अभिवादन केले.
