कोद्रे फार्म आयोजित चिंटू चित्रकला स्पर्धेत मुलांचा उत्तम प्रतिसाद

पुणे :  बाल दिनाच औचित्य साधून कोद्रे फार्मच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चिंटू चित्रकला स्पर्धा आणि प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद मिळाला. वय वर्ष 6 ते 16 वयोगटातील 200 हून जास्ती मुलामुलींनी स्पर्धेत भाग घेतला, ह्या स्पर्धकांचा उत्साह त्यांच्या पालकांमुळे आणि ‘चिंटू’कार चारुहास पंडित यांच्या उपस्थितीमुळे द्विगुणित झाला. चारुहास पंडित ह्यांनी चित्रकलेबद्दल स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

श्रनिकित .कोद्रे, श.विक्रम देशमुख आणि अभिजीत ताम्हाणे व पेठकर पल्लवी या सर्वांच्या सहकार्य व मार्गदर्शनाने आजचा कार्यक्रम कोद्रे फार्म (वडगांव धायरी)च्या निसर्गरम्य वातावरणात अतिशय चांगल्या प्रतिसादात पार पडला. येत्या २२ नोव्हेंबर २०२१ ला मृदगंध च्या पहिल्या वर्धापन दिनी स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात येईल, अशी माहिती कोद्रे फार्मचे श्रनिकित कोद्रे यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: