आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे 108 नवीन रुग्ण

पुणे : शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची संख्या शंभरच्या पुढे गेली आहे. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 108 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 94 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 53 हजार 63 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 95 हजार 513 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 5 तर पुणेमहापालिका हद्दीबाहेरील 3 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9084 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 766 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 101 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 4462 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: