त्रिपुरा हिंसाचार प्रकरण : मालेगावमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलकांकडून दगडफेक

मालेगाव :  त्रिपुरामध्ये मुस्लिम समाजावर होत असलेल्या आत्याचाराच्या निषेधार्थ मालेगावमध्ये बंद पुकारण्यात आला. पण, या बंदला हिंसक वळण लागले असून आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये  3 पोलीस अधिकारी, 7 कर्मचारी आणि 2 नागरिक जखमी झाले आहेत. तर दगडफेक करून तोडफोड करणाऱ्या 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती आहे. सध्या या भागात तणावाचे वातावरण असून येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरामध्ये मुस्लिम समाजावर आत्याचारा होत असल्याच्या घटना घडत आहेत. याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात ठिकठिकाणी वेगवेगळ्या संघटनांकडून बंद पुकारण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्येही बंद पुकारण्यात आला होता. व्यापारी,दुकानदार, नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. त्यामुळे नेहमी गजबजून असलेल्या मालेगावात शुकशुकाट पसरला होता. मनमाडमध्ये देखील व्यवहार बंद ठेऊन हिंसाचाराचा निषेध केला. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम संघटनांनी केली आहे.

दिवसभर शांततेत चाललेल्या बंदला संध्याकाळी हिंसक वळण लागले.  काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्यात. या घटनेमध्ये 3 पोलीस अधिकारी,7 कर्मचारी आणि 2 नागरिक जखमी झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: