Saturday, May 2, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता

पुणे: अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्राचा प्रभाव म्हणून मुंबईसह महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र भारतीय किनारपट्टी पासून दूर गेलं आहे. यानंतर आता अंदमानच्या समुद्रात नवीन संकट उभं ठाकलं आहे. या ठिकाणी देखील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होतं आहे. पुढील 24 तासात याची तीव्रता वाढणार आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांसाठी राज्यात विविध ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

उद्या सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस धडकण्याची शक्यता आहे. यासोबतच रत्नागिरी, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या सहा जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यात उद्या सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पण उद्यापासून मात्र राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading