‘वी’ने ५जी चाचणी करण्यासाठी केली नोकियासोबत भागीदारी

नवी दिल्ली : आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी वोडाफोन आयडिया लिमिटेडने (व्हीआयएल) आपली तंत्रज्ञान भागीदार कंपनी नोकियासोबत आज घोषणा केली आहे की त्यांनी ५जी ची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.  गुजरातमधील गांधीनगरमध्ये ग्रामीण भागांमध्ये ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरवण्यासाठी, या चाचणीमध्ये ५जी चाचण्यांसाठी सरकारने वाटप केलेल्या ३.५ गिगाहर्ट्झ स्पेक्ट्रम बँडमध्ये ५जीचा वापर करण्यात आला. 

नोकियाची सुविधा वापरून वीने १७.१ किमी क्षेत्रामध्ये ५जी कनेक्टिव्हिटी पुरवण्याची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली आणि या कनेक्टिव्हिटीचा वेग १०० एमबीपीएसपेक्षा जास्त होता. नोकियाच्या सहयोगाने वीने केलेली ही ५जी चाचणी भारत सरकारच्या,ग्रामीण भागांमध्ये विश्वसनीय आणि उच्च वेग असलेली कनेक्टिव्हिटी पुरवण्याच्या डिजिटल भारत अभियानाचे समर्थन करणारी आहे.

मोठ्या तसेच लघु व मध्यम व्यवसायांना विश्वसनीय कनेक्टिव्हिटी पुरवून त्यांना साहाय्य करणाऱ्या चाचणीसाठी वी नोकियाच्या एअरस्केल रेडिओ पोर्टफोलिओ आणि मायक्रोवेव ई-बँड सुविधेचा देखील वापर करत आहे.

वोडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर जगबीर सिंग यांनी सांगितले,”गेल्या दोन वर्षात डिजिटलायजेशनचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर व अतिशय वेगाने झाल्यामुळे उच्च वेग असलेल्या ब्रॉडबँडवर विसंबून राहण्याचे तसेच आजवर कनेक्टेड नसलेल्या प्रत्येक गोष्टीला कनेक्ट करण्याचे प्रमाण वाढले आहे.  भारतातील सर्वात वेगवान नेटवर्क वी गिगानेट शहरी तसेच ग्रामीण भागातील युजर्सना तसेच व्यवसायउद्योगांना या डिजिटल युगामध्ये आघाडीवर राहण्यात सक्षम बनवत आहे.  ५जी साठी सुसज्ज असलेले आमचे नेटवर्क आणि आमचे भागीदार नोकियाची प्रत्यक्ष फील्डवर सिद्ध झालेली सुविधा यांच्यासह आम्ही ग्रामीण भागांमध्ये उच्च वेग असलेल्या ५जी कव्हरेजवर आधारित सुविधा आणि युज केसेस पुरवण्यासाठी काम करत आहोत.”   

 

नोकियाचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ इंडिया मार्केट संजय मलिक यांनी सांगितले, “आमची फिक्स्ड वायरलेस ऍक्सेस ५जी सुविधा वोडाफोन आयडियासारख्या सेवा पुरवठादारांना दुर्गम भागांमध्ये ५जी कव्हरेज पुरवण्यात, कव्हरेजमधील कमतरता दूर करण्यासाठी आणि ग्रामीण भागांमध्ये सेवा स्तर उंचावण्यासाठी सक्षम बनवत आहे. वोडाफोन आयडिया ही कंपनी दीर्घकाळापासून आमची सहयोगी असून ग्रामीण भागांमध्ये उच्च वेग असलेली कनेक्टिव्हिटी पुरवण्यासाठी ५जी ची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडण्यात त्यांना साहाय्य पुरवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.”

नोकियाचे हाय गेन एफडब्ल्यूए सीपीई (कस्टमर प्रिमायसेस इक्विपमेंट) ऑपरेटर्सना दुर्गम आणि ग्रामीण भागांमध्ये अल्ट्रा हाय स्पीड आणि कमी लॅटेन्सी असलेली ५जी कनेक्टिव्हिटी पुरवण्यात सक्षम बनवते. 

Leave a Reply

%d bloggers like this: