Saturday, May 2, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

समीर वानखेडेंच्या आत्याची नवाब मलिक यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

औरंगाबाद : क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील आरोप प्रत्यारोपामुळे .सध्या हा विषय चर्चेचा बनला आहे.  एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. आता समीर वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव यांनीही वादात उडी घेतली असून  नवाब मलिक यांच्यावर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार औरंगाबाद मधील  मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी सातत्यानं समाजात आणि नातेवाईकांत बदनामी करत असल्याचा आरोप करत समीर वानखेडे यांच्या आत्यानं तक्रार केला आहे.

गुंफाबाई भालेराव यांनी कुटुंबातील नातेवाईकांची पूर्ण वंशावळ आणि जातीचे दाखलेही तक्ररीसोबत सोबत जोडले आहेत. मंत्री असतानाही मलिक मुस्लीम म्हणून हिणवत आहेत. वानखेडे कुटुंबिय नवबौद्ध नसून ते मुस्लीमच आहेत, असं म्हणून सतत परिवाराची बदनामी सुरु केली आहे. त्यामुळे नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप झाला आहे. जातियवादी वक्तव्य केल्यामुळं नवाब मलिक यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. समीर वानखेडे यांच्या आत्यांनी तक्रारीत नमूद केल्यानुसार, आमचे मूळ गाव वाशिम जिल्ह्यातील वरुड कोपा असून आम्हाला सर्वजण नवबौद्ध जातीचे म्हणून ओळखतात. त्याचप्रमाणे सन्मान देतात, नोकरी आणि कामानिमित्त आमच्यातील काहीजण विशेषतः समीर वानखेडे आणि त्याचे वडिल मुंबई परिसरात राहिलेले आहेत. मलिक यांनी जाणीवपूर्वक मागासवर्गीय असल्यामुळे त्रास देण्यासाठी खोटी माहिती पुरवून वारंवार आरोप केले आहेत. या आरोपांमुळे माझी आणि कुटुंबियांची मनस्थिती खूप बिघडी आहे. आम्ही मानसिक तणावात शेवटचा उपाय म्हणून आपल्याकडे तक्रार घेऊन आलो आहोत.असे गुंफाबाई भालेराव यांनी म्हटले आहे.

जातीच्या बोगस दाखल्याद्वारे समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच समीर वानखेडे जन्मानं मुस्लीम आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव वानखेडे नसून दाऊद वानखेडे असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. मलिकांच्या या आरोपाविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading