NSUI च्या “शिक्षण वाचवा, राष्ट्र वाचवा” या राष्ट्रीय अभियानाची सुरुवात

मुंबई : नवीन शैक्षणिक धोरण शिक्षणाचे केंद्रीकरण आणि खाजगीकरणाला प्रोत्साहन देते. तसेच, संपूर्ण देशात कोविडचा कहर असताना हे शिक्षणविरोधी धोरण देशातआणले गेले. मोदी सरकारला शिक्षण हे केवळ श्रीमंतांसाठीच सुविधा बनवायचे आहे, हा उद्देश स्पष्ट आहे. गरीब मुलांच्या भवितव्याशी हा थेट खेळ खेळण्याचा घाट हे मोदी सरकार घालत आहे.

भाजप सरकारच्या खाजगीकरणामुळे नोकऱ्या,आरक्षण आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त होईल. सरकारी संस्थांच्या खाजगीकरणामुळे देशातील तरुणांसाठी कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी संपुष्टात येतील. आता नवीन शिक्षण धोरणही खाजगीकरणाला चालना देत आहे, गरीबांनी जायचे कुठे? त्यांनी शिकायचे नाही का? त्यांचे अधिकार हक्क हिरावण्याचा कुठलाही नैतिक अधिकार या केंद्रातील मोदी सरकारला नाही असे मत प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांनी व्यक्त केले.

अभियानाची सुरुवात आज मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आली या वेळी एन.एस.यु.आय.चे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, काँग्रेस पक्ष्याचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रवक्ते राजू वाघमारे आदींची उपस्थिती होती

Leave a Reply

%d bloggers like this: