Good news – MPSC परीक्षेला बसण्यासाठी एक वर्षांची मुदतवाढ
मुंबई : राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक मोठ्या परिक्षांप्रमानेच MPSC ची परीक्षा ही पुढे ढकलण्यात आली. यामुळे परीक्षेला बसण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांची वयोमार्यादा ओलांडली गेली होती. यापार्श्वभूमीवर MPSC परीक्षेला बसण्याच्या वयोमार्यादेत एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे ज्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा विद्यार्थ्यांना याचा दिलासा मिळणार आहे.
येत्या 19 नोव्हेंबरला MPSC परीक्षेचा अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. आज झालेल्या निर्णयामुळे अनेक एजबार झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे वयाची मर्यादा दोन वर्षांनी वाढवावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चर्चा झाली. आता एक वर्ष मुदतवाढ देण्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
