दस्तकारी हाट समिती पुणे पर्व १३ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर 

पुणे : भारतातील हस्तकलेचा प्रसार करण्याची गेल्या ३५ वर्षांची परंपरा अबाधित राखत दस्तकारी हाट समिती कडून नेहमीच हस्तकलाकारांना प्रोत्साहन देऊन कलाकार आणि ग्राहकांना जोडण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. महामारी मुळे मिळालेल्या दीर्घकालीन विश्रांती नंतर आता पुण्यात पुनरागमन करत बहुप्रतिक्षित असा कलाकारांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेला क्राफ्ट बाझार आता शहरात नवीन ठिकाणी सुरू होत असून, यामुळे मित्रांसाठी  जुन्या आणि नव्या मित्रांच्या स्वागतासाठी तयार आहे.

दस्तकारी हाट समितीने नेहमीच अगदी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून सुयोग्य प्रमाणात रेशन आणि सहकार्य कलाकारांना देऊ केले आहे.  त्यांनी नेहमीच गरजवंतांना मदत केली आहे, विशेषकरून ज्यांना भाडं भरणे शक्य नव्हते, ज्यांना शाळेची फी, वैद्यकीय उपचारांची गरज होती त्यांना मदत करून त्यांच्या अन्य गरजाही पूर्ण केल्या आहेत.  जरी हे कलकार वित्तीय आणि वैयक्तिक आव्हानांचा मुकाबला करत होते तरीही त्यांनी काम थांबवले नाही आणि म्हणूनच महामारी संपल्यावर आता त्यांची कला जगासमोर आणण्याची वेळ आली आहे.

पुण्यातील या मौसमामुळे आता आशेचा किरण निर्माण झाला असून आता या महोत्सवात आपल्याला विणकर, हॅन्ड ब्लॉक प्रिंट्स, एम्ब्रॉयडरीज, काचेवरील चित्रे, बांबू, धातू, लाकडांपासून तयार केलेल्या वस्तू आणि अन्य वनस्पतीजन्य कला, दागिने, स्टेशनरी, सिरॅमिक आणि टेराकोटा, परंपरागत गोंड ते कलिंग आदिवासी कला, फडांपासून ते पट्टचित्र आणि पिचवाईज चे ९० स्टॉल्स लावण्यात आलेले पहायला मिळतील.

दस्तकारी हाट समिती पुणे पर्व १३ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर 

कुठे- डच पॅलेस, १६ बंड  गार्ड रोड, रेसिडेन्सी क्लब जवळ, पुणे

कधी – १३ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२१

वेळ – सकाळी ११ ते रात्री ८

प्रवेश- मोफत

Leave a Reply

%d bloggers like this: