पुना क्लब आयोजित दिवाळी करंडक गोल्फ स्पर्धेत गोल्फ क्लब संघाला विजेतेपद 

पुणे :  पुना क्लब यांच्या वतीने दिपावळीनिमित्त आयोजित केलेल्या दिवाळी करंडक सांघिक गोल्फ स्पर्धेत इक्रम खान, ललित चिंचाळकर, गौरव गढोके आणि दीपा धानी यांचा समावेश असलेल्या गोल्फ क्लब संघाने विजेतेपद संपादन केले. या संघाने सर्वाधिक एकूण १६० गुणांची नोंद केली.
संपूर्णपणे नव्या फॉरमॅटचा समावेश असलेल्या या सांघिक स्पर्धेत एकूण ९२ गोल्फपटूंनी सहभाग नोंदविला होता. ललित चिंचाळकर यांनी विजेत्या गोल्फ क्लब संघांचे कर्णधारपद भूषविले.
उपविजेत्या संघात जयंत थोरात, भक्ती थोरात, नितीन लुंकड, संग्राम किर्लोस्कर यांचा समावेश असून त्यांनी १०२ गुणांची नोंद केली. तिसऱ्या क्रमांक पटकावणाऱ्या संघात राघव अगरवाल, मि कीओंग, अनुज धोडी, दिपक सूद यांचा समावेश असून त्यांनी ९७ गुणांची कमाई केली.
स्पर्धेतील अन्य पारितोषिक विजेते पुढीलप्रमाणे: 
१. क्लोजेस्ट टु द होल  नंबर २: जिया करदभाजणे(३६फूट ४ इंच);
२. क्लोजेस्ट टू द होल नंबर ४: विधिश करदभाजणे(६फूट ४ इंच);
३. क्लोजेस्ट टु द होल नंबर १३: चेतन रिक्झिन(८फुट ५इंच);
४. क्लोजेस्ट टू द होल नंबर १६: विमल देव(२५फूट).

Leave a Reply

%d bloggers like this: