रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन तर्फे महिला शेतकऱ्यांना सोलर ड्रायरची मदत

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन तर्फे महिला शेतकऱ्यांना सोलर ड्रायरची, ग्रामीण भागातील शाळेला बाकडयांची मदत देण्यात आली. कोथरूडमधील गांधी भवन येथे बुधवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम झाला. प्रांतपाल पंकज शहा,रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन चे अध्यक्ष मनीष धोत्रे, सचिव अनिकेत साळुंखे यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली.

ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत सोलर ड्रायर देण्यात आले. अतिरिक्त कृषी उत्पन्नावर प्रक्रिया करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. ६ महिला शेतकऱ्यांशी यासंदर्भात सहकार्य करार करण्यात आले.इनामगाव ( जिल्हा पुणे ) या गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना बसायला बाकडी देण्यात आली.

सरपंच पल्लवी घाडगे , ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष गीताराम कदम , अरविंद शाळीग्राम,उषा तानाजी राऊत, रोहिणी संजय शिनलकर, सुनीता दिलीप वाबळे या शेतकरी महिला आदी
उपस्थित होते.

‘प्रत्येक ड्रायर २५ हजार रुपयांचा आहे. पाच शेतकऱ्यांनी मिळून तो वापरायचा आहे. या निमित्ताने ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जात आहे. आणखीही शेतकऱ्यांना अशी मदत देण्याचे नियोजन आहे, असे मनीष धोत्रे यांनी सांगीतले.

पंकज शहा म्हणाले, ‘ सोलर ड्रायरचा उपयोग अधिकाधिक करुन ग्रामीण शेतीतील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचा हा चांगला उपक्रम आहे. रोटरी चे उपक्रम शाश्वत असावेत, दूरगामी परिणाम करणारे असावेत, असे नियोजन आम्ही करीत आहोत.

दीपा पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. अश्वीनी प्रधान यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: