Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNE

नवाब मलीक यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

पुणे:अंमली पदार्थ विक्रीत सहभागी व्यक्तींची पाठराखन करणारे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज तीव्र आंदोलन केले. हे आंदोलन पुण्यात स्वा. सावरकर स्मारक, कर्वे रोड  येथे करण्यात आले.

हे आंदोलन भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी अंमली पदार्थ विक्रीत सहभागी व्यक्तींची पाठराखण करणाऱ्या  नवाब मलिक यांचं निषेध करण्यात आला. या आंदोलनाला भाजप युवा मोर्चा पुणे शहर चे अध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर, अभिजित पवार, आदित्य जागडे, भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगदीश मुळीक म्हणाले,अंमली पदार्थ विक्रीत सहभागी व्यक्तींची पाठराखण करणाऱ्या आणि दररोज पत्रकार परिषद घेऊन बिनबुडाचे आरोप करणाऱ्या मंत्री नवाब मलीक हे दररोज भाजप नेत्यावर टीका करत आहेत. समीर वानखेडे यांची नवाब मलिक यांची पाठराखण करत आहे. समीर वानखेडे वर जे आरोप झाले आहेत . एकदम खरे आहेत. नवाब मलिक यांनी आमच्या भाजपच्या नेत्यावर टीका करणे सोडावे. अमली पदार्थ विक्रीत सहभागी व्यक्तींची पाठराखण करणे सोडावे. म्हणून आज आम्ही तीव्र आंदोलन करत आहोत . असे जगदीश मुळीक म्हणाले.
राघवेंद्र बापू मानकर म्हणाले,अंमली पदार्थ विक्रीत सहभागी व्यक्तींची पाठराखण करणाऱ्या आणि दररोज पत्रकार परिषद घेऊन बिनबुडाचे आरोप करणाऱ्या मंत्री नवाब मलीक त्यांनी जरा थांबावावे
अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी करत आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading