Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNE

आगामी महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी अद्ययावत करण्याच्या दृष्टीने सर्वपक्षीय बैठक संपन्न

पुणे : आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादी अद्ययावत करण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्यावतीने सर्वपक्षाचे गटनेते व पक्षप्रमुखांची काल बैठक घेत, मतदार यादीतील दुरूस्ती, नवीन नोंदणी, नावे वगळणे याकरिताची आवश्यक ती माहिती दिली.
या बैठकीला उपमहापौर सुनिता वाडेकर, स्थारी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेता गणेश बीडकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ , कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसेचे गटनेते साईनाथ बाबर, एआयएमआयएमच्या गटनेत्या अश्‍विनी लांडगे , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.
महापालिकेचे निवडणूक अधिकारी उपायुक्त अजित देशमुख यांनी यावेळी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत विविध माध्यमांद्वारे करण्यात येत असलेल्या जनजागृतीबाबत उपस्थितांना माहिती दिली.

तसेच नवीन नाव नोंदणी, नाव वगळणे, स्थलांतरीतांची नावे वगळणे, मतदारसंघातील पत्त्यामधील बदल करण्यासाठी कोणते फॉर्म वापरावे यासाठी माहिती यावेळी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading