पुणेकरांच्या पैश्याची उधळण का केली जात आहे ? राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

पुणे: प्रभाग-३६ मधील आईमाता मंदिर ते गंगाधाम चौक रस्त्यावरील ६ वर्षांपूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून बांधण्यात आलेले स्वच्छतागृह २०१८ च्या महिला बालकल्याण समितीच्या ठरावानुसार आणि प्रभाग समिती स्थानिक लोकप्रतिनिधींच्या ठरावाने पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.ऐन दिवाळीच्या सुट्टीमध्ये रात्रीच्या वेळेस पाडण्यात आले आहे.

त्यासंदर्भात पुणे महापालिका अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असतां त्यांनी सदर स्वच्छतागृह हे रस्ता रुंदीकरणासाठी पाडण्यात आले असल्याचे सांगितले,सदर रस्ता सन २०१३ च्या प्रारुप पुर्नरलोकन विकास आराखड्यामध्ये ३० मीटरच बांधण्यात आला होता आणि आज हि तेवढाच आहे.तरी सदरचे स्वच्छतागृह त्या ठिकाणी का बांधण्यात आले होते?रात्रीच्या वेळी सदर स्वच्छतागृह पाडण्याचे कारण काय? कोणाच्यातरी सांगण्यावरून. अथवा दवाबापोटी पाडण्यात आले आहे का? हे अद्याप समजले नाही. यामध्ये पुणेकरांच्या कररुपी पैश्याची उधळण का केली जात आहे ? अथवा संबंधित त्या ठिकाणी असणाऱ्या बिल्डरकडुन काहि आर्थिक देवाण-घेवाण झालेली आहे का?या बाबींची चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी पर्वती विधानसभेच्या वतीने यावेळी नितीन कदम,मृणालवाणी,संतोष नांगरे,सुनिल बिबवे,अभिजीत उंद्रे,सुनिता मोरे,श्वेता होनराव,अमोल ननावरे,शिवम ईभाड, निलेश नवलखा , प्रमोद संचेती,अर्जुन दसाडे,संजय दामोदरे,मिलिंद कडभाने,सोनली उजागरे,संतोष पिसाळ,रुपाली बिबवे,प्राजक्ता जाधव, किरण सातपुते, ज्योती ताकवले, प्रशांत साष्टे,प्रमोद कोठावळे,नरेश बागुल,फारुख शेख, संग्राम होनराव,दिपक कामठे,विनायक ताकवले उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: