रंगभूमीवरील बाल कलाकराचा सायकलद्वारे सोलापूर ते पुणे प्रवास

पुणे : मराठी रंगभूमीदिन आणि देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोलापुरातील रंगभूमीवरील बाल कलाकार देवांश विजय क्षीरसागर (वय 8) सोलापूरहून सायकलवरून प्रवास करीत आज पुण्यात आला. या निमित्ताने बाल रंगभूमी परिषदेच्या वतीने त्याचा बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात सत्कार करण्यात आला.

नाट्य संस्कार कला अकामदी आणि बाल रंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेतर्फे अध्यक्ष प्रकाश पारखीबाल रंगभूमी परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष उदय लागू यांच्या हस्ते देवांश याचा सत्कार करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजनरंगकर्मी देवेंद्र भिडे उपस्थित होते.

देवांशच्या या धाडसी उपक्रमाची माहिती देताना त्याचे वडिल विजय क्षीरसागर म्हणालेदेवांशला सायकल चालविण्याची आवड असून तो सोलापूर सायकल फाउंडेशचा सदस्य आहे. 15 किल्ल्यांवर त्याने रॅपलिंग केले असून कळसुबाई शिखरही सर केले आहे. मराठी रंगभूमीदिनी (दि. 5 नोव्हेंबर) त्याने सोलापुरातून सायकल प्रवासाला सुरुवात केली असून चार दिवसात 250 किमी प्रवास केला आहे. प्रवासादम्यान ठिकठिकाणच्या रंगभूमीला आणि ज्येष्ठ कलाकारांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद तो घेत आहे.

देवांशच्या धाडसाचे कौतुक करून उदय लागू म्हणालेदेवांशच्या या कृतीमुळे मोबाईलच्या जाळ्यात अडकलेल्या बाल आणि युवा पिढीपुढे आदर्श निर्माण होईल. त्याला साथ देणार्‍या पालकांचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

प्रकाश पारखी म्हणालेबाल वयात देवांशने मोबाईच्या आहारी न जाता वेगळा मार्ग अवलंबला आहेपालकही त्याला प्रोत्साहन देत आहेत. देवांश आणि त्याच्या पालकांची कृती विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना निश्चितच प्रेरणादायीबोध घ्यायला लावणारी आहे. पालकांनी मुलांच्या अशा आवडीनिवडी जपल्या पाहिजेत तसेच त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.  

Leave a Reply

%d bloggers like this: