Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

अरबी समुद्रात निर्माण झालेलं हवेच्या कमी क्षेत्रामुळे उद्या आणि परवा अरबी समुद्रात वादळी वारे वाहण्याची शक्यता


पुणे:अरबी समुद्रात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र  पुढील 12 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याआणि परवा अरबी समुद्रात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना मासेमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान खात्याकडून  देण्यात आला आहे. असं असलं तरी सुदैवाची बाब म्हणजे, अरबी समुद्रात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात आहे. याचा महाराष्ट्राला कोणताही धोका नाही. पण उद्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसणार आहेत.

पूर्व-मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र पुढील 12 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज अरबी समुद्रात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर उद्या वाऱ्यांचा वेग काहीसां मंदावणार असून उद्या 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहे. पुढील 48 तासात अरबी समुद्रात हवामाची हीच स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर हवेच्या कमी दाबाचा प्रभाव हळुहळू कमी होण्याची शक्यता आहे.

हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र सध्या मुंबईपासून दक्षिण-पश्चिमेला 800 किमी अंतरावर आहे. तर हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र पणजीपासून पश्चिम नैऋत्य दिशेला 700 किमी अंतरावर आहे. सध्या हे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात आहे. तसेच पुढील 48 तासात याची तीव्रता कमी होणार आहे. त्यामुळे भारतीय भूमीत याचा फटका बसणार नसला, तरी अरबी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या मच्छिमारांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading