Pune – खडकवासला प्रकल्पात 29.08 टीएमसी पाणीसाठा

पुणे:खडकवासला प्रकल्पातील चार धरणांतील उपयुक्‍त पाणीसाठा 29.08 टीएमसी (99.77 टक्‍के) झाला आहे. गतवर्षी या प्रकल्पात 29.13 टीएमसी (99.94 टक्‍के) इतका पाणीसाठा होता. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तर, टेमघर धरणही जवळपास पूर्ण भरले आहे; म्हणूनच पुणेकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला असे म्हणता येईल.
शहराला खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या चार धरणांमध्ये २७.५७ टीएमसी (९४.५६ टक्के) पाणीसाठा आहे. जिल्ह्यात भीमा खोरे प्रकल्पातील घोड, कळमोडी, चासकमान, गुंजवणी, नीरा देवघर आणि सोलापूर जिल्ह्यातील उजनी प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा आहे.
खडकवासला प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्केवारी)

खडकवासला – ०.७१ (३६.०९)

टेमघर – ३.५९ (९६.८५)

वरसगाव – १२.६८ (९८.८८)

पानशेत – १०.५९ (९९.४१)

पवना – ८.०८ (९५)

भामा आसखेड – ७.०३ (९१.६९)

मुळशी – १६.५३ (८२.०४)

नीरा देवघर – ११.७३ (१००)

भाटघर – २३.४० (९९.५६)

वीर – ९.०७ (९६.४२)

गुंजवणी – ३.६९ (१००)

डिंभे – १२.२१ (९७.७८)

उजनी – ५३.५७ (१००)

Leave a Reply

%d bloggers like this: