वस्तीतील निराधार मुलींना तुळशीबागेत खरेदीचा आनंद

पुणे : आपल्या आवडी निवडी नुसार दिवाळी निमीत्ताने तुळशीबागेत कपडे खरेदी करावी असे प्रत्येक मुलीला वाटत असते.पण काही अडचणीमुळे काहींना ते शक्य होत नाही… पण तो खरेदीचा आनंद वस्तीतील निराधार मुलींना श्री तुळशीबाग गणपती मंडळ व तुळशीबाग व्यापारी असोसिएशन च्या वतीने देण्यात आला.

समाजातील काही घटकांच्या कुटुंबातील मुलींना दिवाळीनिमीत्ताने कपडे खरेदी चा आनंद घेता येत नाही. त्यांना प्रत्यक्ष दुकानात जाऊन कपडे आणि इतर वस्तू स्वतःच्या इच्छेप्रमाणे खरेदी करण्याचा आनंद घेता यावा या उदात्त हेतुने तुळशीबाग मंडळ, तुळशीबाग व्यापारी यांच्या सहकार्याने गेली अनेक वर्षे राबवित आहे.

तुळशीबाग बाजारपेठेचे आकर्षण महिलांना असून येथे खरेदीसाठी महिला मोठ्या प्रमाणावर येत असतात…तुळशीबाग ही महिलांचे माहेरघर समजले जाते…तिथे आपणही खरेदी करावी असे ह्या मुलींना पण वाटते..त्यामुळे त्या मुलींना तुळशीबागेत आणून खरेदीसाठी दुकानात घेऊन जातात. तुळशीबागेतील व्यापारी त्यासाठी सहकार्य करतात.
जिजाऊ फौंडेशन या संस्थेने शैक्षणिक पालकत्व घेतलेल्या वस्तीतील मुलींना खरेदीसाठी तुळशीबाग बाजारपेठेत आणले होते. तुळशीबाग महागणपती ची आरती करुन खरेदी चा आनंद घेत सांगता कावरे आईस्क्रीम मनसोक्त खाऊन या मुलींनी केली..शिल्पकार विवेक खटावकर सर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत मुलींना मिठाई दिली.
विश्रामबाग पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, शिल्पकार विवेक खटावकर सर, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष नितीन पंडित, जिजाऊ फौडेशन च्या ज्योती ढमाल, श्रीमंत राजे पवार संस्थेचे अध्यक्ष सागर पवार,दत्ताभाऊ कावरे,
विनायक कदम,मोहन साखरीया, किरण चौहान,सुनिल खेडेकर उपस्थित होते. मीनल क्रिएशन चे किरण शेठ गाला यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

%d bloggers like this: