Thursday, May 7, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे देणं आहे ते लवकर द्यावे – शरद पवार

बारामती  : केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहेत याबाबत राज्यातील लोकांना काही दिलासा मिळू शकतो का असा प्रश्न विचारल्यावर शरद पवारांनी त्यावर भाष्य केले आहे. “राज्य सरकारने निश्चित दिलासा देऊ असे म्हटले आहे. पण केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे देणं आहे ते लवकर द्यावे म्हणजे लोकांना अशा प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेता येईल,” असे शरद पवार म्हणाले. पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवार म्हणाले, “संपूर्ण विश्वावर कोरोनाचे संकट आले त्यामुळे प्रत्येकाला काही पथ्ये पाळावी लागत आहेत. कोरोनाचे संकट कमी होत आहे. राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतल्याने कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. लोकांकडून मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगसारखे कोरोनाचे नियम पाळण्याची तयारी असल्याचे सरकारला सांगितले,” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

“एसटी संघटनेतील व्यक्ती मला भेटले होते. त्यांनी हा संप पुढे न्यायचा नाही हे सांगितले होते. दिवाळीच्या काळात नागरिकांना त्रास देणे योग्य नाही अशी आमची भूमिका आहे. काही लोकांनी टोकाची भूमिका घेतली आहे म्हणून हे घडत आहे. ८० ते ८५ टक्के एसटी रस्त्यावर धावत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना माझे आवाहन आहे की संस्थेच्या हितासाठी आणि नागरिकांच्या सुविधेसाठी हे योग्य होणार नाही. कोर्टाने सुद्धा हा संप कायदेशीर नाही अशा प्रकारच्या निष्कर्षाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोर्टाचा आदर ठेवावा आणि हा विषय संपवावा,” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अजित पवारांना कोरोनाची लक्षणे जाणवल्याने आज त्यांची चाचणी घेण्यात आली आहे. अजित पवारांच्या घरातील कर्मचाऱ्यांना कीरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना रिस्क नको म्हणून यायला नाही सांगितलं आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading