fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

कलाकारांना मदतीचा हात देणाऱ्या हातांची कृतज्ञता व्यक्त

पुणे : ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला या कलाकारांनी कलाकारांसाठी कोरोना च्या काळात मदतीचा हात दिला , अशा कलाकारांना आज सन्मानित करण्यात आले ज्यामध्ये अभिनेता आनंद इंगळे विजय पटवर्धन राहुल जोशी जितेंद्र भुरुक दीपाली सय्यद संदीप पाटील मनीष रब्दी प्रताप्राव मोहिते दीपक ऊर्फ आप्पा वायकर अशा अनेक दानशूर लोकांना सिनेअभिनेते प्रवीण तरडे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले लक्ष्मिकांत खाबिया अभिजीत कवठाळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

याप्रसंगी प्रवीण तरडे म्हणाले ऑल आर्टिस्ट फाउंडेशन च्या माध्यमातून जे काही कलाकारांच्या हिताचे कार्य चालू आहे त्याकरता आमचा पाठिंबा असेल तसेच कलाकारांचा न्याय हक्कासाठी आम्ही खंबीरपणे उभे राहू याच बरोबर मेघराज राजे भोसले यांनी संस्थेच्या सभासदांना राज्य शासनाच्या अंतर्गत सभासदत्व मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले याप्रसंगी सिने-नाट्य क्षेत्रातील कला लावणी लोकधारा ऑर्केस्ट्रा क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते याचे निवेदन ऋतुजा मराठे यांनी केले तर स्वागत चित्रसेन भवर यांनी करून आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष बबलू खेडकर यांनी केले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading