Wednesday, May 6, 2026
Latest NewsPUNE

शेकडो आकाशकंदिलांनी सजले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर

पुणे : रंगीबेरंगी आकाशकंदिरांची आकर्षक सजावट, विविधरंगी दिवे, आकर्षक झुंबरे आणि नानाविध फुलांनी दीपावलीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर सजविण्यात आले. मंदिराचा संपूर्ण परिसर आकाशकंदिल, पणत्या आणि रांगोळीच्या पायघडयांनी सुशोभित करण्यात आला. दीपावलीनिमित्त केलेली ही शेकडो आकाशकंदिलांची सजावट आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासोबतच हे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठविण्याकरीता भाविकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीनिमित्त मंदिरावर शेकडो आकाशकंदिलांची आकर्षक सजावट करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांसह विश्वस्त व कारागिरांच्या संकल्पनेतून ही सजावट साकारण्यात आली.
अशोक गोडसे म्हणाले, अंध:कारवर मात करुन प्रकाशाकडे नेणारा हा दीपोत्सव आहे. त्यामुळे गणपती बाप्पाच्या कृपेने सगळ्यांच्या जीवनात आरोग्यसंपन्नता आणि आनंद निर्माण होवो. तसेच कोविडसारख्या संकटांना तोंड देण्याची शक्ती बाप्पा सर्वांना देवो, अशी प्रार्थना आपण करुया, असेही ते म्हणाले.  दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवापलीनिमित्त मंदिरावर आकाशकंदील, पणत्या लावण्यासोबतच मंगलआरती, पूजन असे विविध धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरात पार पडले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading