नैसर्गिक संकटानी शेतकरी त्रस्त असताना सरकार शेतकऱ्यांना का मदत करत नाही- चंद्रकांत पाटील


पुणे:राज्यात नैसर्गिक संकटांनी शेतकरी त्रस्त असताना मदतीऐवजी मविआ सरकार पोपटपंची करतंय. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. राज्यात २९ अस्वस्थ एसटी कर्मचाऱ्यांनीही आत्महत्या केल्यात. ST कर्मचारी, शेतकऱ्यांनो, आम्ही तुमच्यासोबत आहोत असे सांगण्यासाठी सरकारच्या निषेध वक्त करण्यासाठी  आज काळी फीत लावून भाजप अख्या राज्यभर आंदोलन करत आहे. त्यावर नैसर्गिक संकटानी शेतकरी त्रस्त असताना सरकार शेतकऱ्यांना का मदत करत नाही असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत राज्य सरकारला विचारला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले ,बरेच दिवसापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीवर महाविकासआघाडी मधील नेते कुठल्या तरी प्रकरना वरून आरोप करत आहे त्या वर  देवेंद्र फडणवीस शांत राहतात . असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
परवा पुण्यात शिवसेनेचे खासदार व नेते संजय राऊत येणाऱ्या 2024 साली निवडणुकीमध्ये मध्ये दिल्लीतील चित्र पूर्णपणे बदललेलं असेल . त्यावर आज चंद्रकांत पाटील यांनी 2024 ला केंद्रामध्ये सत्ताबदल नेतृत्व बदलण्यासाठी संजय राऊत यांना माझ्या शुभेच्छा आहेत.

समीर वानखेडे प्रकरणावर पण चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले, समीर वानखेडे यांच्या पाठीमागे भाजप पूर्णपणे पाठीमागे थांब उभी आहे. समीर वानखेडे प्रकरणावर आमच्या भाजपच्या एकाही नेत्याने अजून प्रतिक्रिया दिली नाही.
संजय राऊत महाविकास आघाडीचा प्रवक्ता म्हणून रोज सकाळी प्रसारमाध्यमांची संवाद साधून आमच्यावर टीका करायचे. तसे आता नवाब मलिक रोज महाविकास आघाडीचा प्रवक्ता म्हणून आमच्यावर टीका करत आहेत . अशी टीका त्यांनी नवाब मलिक यांच्यावर केली.

काही दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी दाऊतसंदर्भात शरद पवारांवर एक आरोप केला होता तो आरोप नवाब मलिक आता उखडून काढत आहेत त्यावर पाटील म्हणाले हा आरोप जुना आहे. असे पाटील म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: