अनोख्या गोल्फ प्रीमियर लीग स्पर्धेत 72 खेळाडूंचा सहभाग 

पुणे : पुण्याजवळील बेलमोंडो येथे एका महिन्यापेक्षा अधिक काळ रंगणाऱ्या ब्रिजस्टोन गोल्फ प्रीमियर लीग स्पर्धेत 6 संघांचा सहभाग असून यामध्ये तब्बल 72 गुणवान हौशी गोल्फपटूचे कौशल्य पाहण्याची संधी मिळणार आहे. एस गोल्फिंग वतीने आयोजित अशा प्रकारची स्पर्धा पुण्यात प्रथमच होत असून एकाचवेळी बेलमोंडो गोल्फकोर्स, ब्लुरीच गोल्फ कोर्स आणि नाईन एसेस(कर्जत) या तीन गोल्फ कोर्सवर स्पर्धा पार पडणार आहे.
एक्को, मेशवर्क्स अशा नामंकित ब्रँडचे प्रायोजकत्व मिळालेल्या या स्पर्धेत सहभागी होणारे 72 खेळाडू सहा संघांचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. बिंदास बॉईज, ईगल स्ट्रायकर्स, नाऊ मारवेल, रिगल वॉरियर्स, एमिगोज आणि एअरस्ट्रायकर्स हे संघ सहभागी झाले असून   7 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2021 दरम्यान हि स्पर्धा रंगणार आहे. अव्वल दोन संघांमध्ये 12डिसेंबर 2021 रोजी अंतिम सामना रंगणार आहे.
या स्पर्धेसाठी झालेल्या 66 खेळाडूंच्या लिलावात आदित्य पांडे हा सर्वात महागडा खेळाडू ठरला असून तो एमिगोज संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. एस  गोल्फिंगचे आदित्य मालपाणी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेली हि स्पर्धा अभिनव प्रकाराची असून कल्पक डावपेच, गणिती आकडेमोड, गोल्फमधील कौशल्य या तीनही गोष्टी पणाला लावणार आहे. या स्पर्धेविषयी बोलताना आदित्य मालपाणी म्हणाले कि, हौशी खेळाडूंमध्ये गोल्फविषयी आवड निर्माण व्हावी आणि बेलमोंडो येथील गोल्फ कोर्सवर खेळाडूंचा सहभाग वाढावा अशी या स्पर्धेमागील कल्पना आहे. तसेच, या स्पर्धेच्या माध्यमातून 80 हुन अधिक नवे गोल्फपटू तयार करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. या स्पर्धेसाठी लिलाव झालेल्या खेळाडूंची निवड हि पैशाच्या आधारे करण्यात आली नसून त्यांच्या हॅंडीकॅप स्कोअरवर आधारित करण्यात आली आहे.
 
साखळी फेरीत या स्पर्धेतील सहा सहभागी संघ एक सामना प्रत्येक संघाविरुद्ध खेळणार आहे. प्रत्येकवेळी 18 होल्ससाठी इंडिव्हीज्युअल स्ट्रोक प्ले(वैयक्तिक)कामगिरीच्या निकषावर विजयी संघ ठरविला जाणार आहे. प्रत्येक सामान्यातील विजयी संघाला  2   गुण मिळणार असून साखळी स्पर्धेअखेर अव्वल दोन सामना अंतिम सामना होणार आहे. हि अंतिम लढत एस  गोल्फिंगद्वारा विकसित करण्यात आलेल्या रायडर्स कपच्या धर्तीवर खेळली जाणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: