वीज बिल वसूल साखर कारखान्या मार्फत नको – नागेश वनकळसे

पुणे : कारखान्यातर्फे शेतकऱ्यांच्या उसबिलामधून महावितरण (MSEDL ) चा वीज बिल वसूल करण्यास हरकत असल्याबाबत व त्याला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे सांगत शिवसेनेचे  नागेश वनकळसे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची पुणे येथे भेट घेतली व सविस्तर चर्चा करून  सदर निर्णय मागे घेण्याची मागणी केली.

 याबाबत सविस्तर माहिती अशी की  साखर कारखाण्यांना पुढे करून वीजबिल वसूल शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कपात करण्याचे धोरण आखले गेले आहे तसा जो शासन निर्णय झाला आहे  त्याला शेतकऱ्याचा तीव्र विरोध कारण अगोदरच एफ,आर,पी तीन टप्यात देण्याचे धोरण, थकलेली ऊस बिले, गोत्यात गेलेले कारखाने, आगोदरची कारखान्याची

शेतकरी व  कामगारांची भरमसाठ थकलेली देणी अशी वाईट अवस्था कारखानदारांची आहे त्यामुळे कारखानदार वीज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या माथी मारू नये अशी मागणी नागेश वनकळसे यांनी केली कोरोना महामारी, पूर, शेतीमालाचे गडगडलेले भाव, प्रचंड लोडशेडींग यामुळे शेतकरी त्रस्त आहे त्यामुळे महावितरनाने कारखान्याच्या आडून पैसे घेऊ नयेत अगोदर वीजपुरवठा शेतीसाठी व्यवस्थित करावा आणि महावितरणणे स्वतः वीज बिलाचा वसूल करावा, हक्काच्या उसाच्या दोन पैश्यात मन घालु नये अशी भावना शेतकऱ्यांची आहे व आयुक्ताना सांगितली.

महावितरणाची वीज वसुली कारखानदाराने करावी हा निर्णय बँका, सोसायट्याच्या धर्तीवर करावी हा शासन निर्णय दोन वर्षापूर्वी झालेला आहे, शेतकऱ्यांना अंधारात ठेवून वीज वसूल होणार नाही.

शेखर गायकवाड, साखर आयुक्त पुणे   

शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला कोणतेही समत्ती पत्र देऊ नये, महावितरणाच्या कोणत्याही  कारखान्याने दिलेल्या कागदावर सही करू नये, शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय कपात होणार नाही.व निर्णय कायमस्वरूपी रद्द व्हावा यासाठी पुढचा लढा

नागेश वनकळसे 

Leave a Reply

%d bloggers like this: