Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRA

महावितरणच्या सुलतानी वसुलीबाबत मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना संजय कोकाटे यांचे पत्र

करमाळा: महावितरणची शेतकर्यांकडील सदोष बिलांची थकबाकी वसुली मोहीम रद्द करणेबाबत माढा विधानसभा मतदारसंघातील शेतकर्यांची थकबाकी वसुली साखर कारखान्यातर्फे करण्याचा साखर आयुक्तांचा आदेश रद्द करण्याबाबत
गेल्या अनेक महिन्यांपासून महावितरण शेतकर्याकडे असणार्या थकबाकीबाबत वसुली करण्याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत आहे महत्त्वाच्या वेळेस विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद करणे व अगोदरच अडचणीत आलेल्या शेतकर्यांना अडचणीत आणने असे उद्योग महावितरणचे अधिकारी करत आहेत यांच्या या मोहिमेमुळे उलट वीजबिल भरणारे शेतकरीसुद्धा वीजबील भरत नाहीत कारण पैसे भरून सुद्धा त्यांना वीज मिळत नाही महावितरणकडे रीडिंग घेणे व रीडिंगप्रमाणे बिलाचे वाटप करणे यासाठी कुठलीही यंत्रणा नाही ऑफिसमध्ये बसून मनाला वाटेल तेवढी बिले शेतकऱ्यांच्या नावावर फीड केली जातात कित्येक महिने वापर नसणाऱ्यानासुद्धा लाखो रुपयांची बिले दिलेली आहेत.

महावितरणकडे रीडिंग घेण्यासाठी बिले वाटपासाठी किंवा मेंटेनन्स करण्यासाठी लागणारी कुठलीही यंत्रणा उपलब्धच नाही.

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून महावितरणने शेतकर्यांना कुठल्याही सेवा सुविधा पुरवलेल्या नाहीत शेतकरी स्वखर्चाने सर्व मेंटेनन्सची कामे करून घेत आहेत महत्त्वाचे म्हणजे बेकायदेशीररीत्या वीज वापरणाऱ्या वर महावितरणचा कुठलाही अंकुश नाही उलट त्यांच्याकडून हप्ते घेतले जातात तसेच पाठीमागच्या काळामध्ये शेतकर्यांनी दिलेली थकबाकीची रोख रक्कम त्यांच्या बिलातून वजा झाली नाही अशा अनेक शेतकर्यांच्या तक्रारी आहेत त्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी वीजबिल भरण्यास नाखूश आहेत तसेच सध्या शेतकर्यांची वीजबिल भरण्याची आर्थिक परिस्थिती नाही अगोदरच अनेक नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि जर अशीच सक्तीची वसुली सुरू ठेवल्यास शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होणार आहे व त्याचा उद्रेक कुठल्याही स्वरुपात होऊ शकतो
म्हणून आपणास नम्र विनंती की सदोष वीजबिलांची थकीत वसुली मोहीम पूर्णपणे रद्द करण्यात यावी त्याचप्रमाणे साखर आयुक्त पुणे यांनी महावितरणच्या थकबाकी वसुलीबाबत पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांबाबत साखर कारखान्यांमार्फत शेतकर्यांच्या थकीत वीजबिलांची वसुली करण्याचा आदेश काढलेला आहे तो रद्द करण्याचे आदेश देण्यात यावेत अन्यथा टक्केवारीमध्ये साखर कारखाने बुडवलेले साखरसम्राट कमिशनसाठी शेतकर्यांना बुडवायला मागेपुढे पाहणार नाहीत.
तरी कृपया माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा ही विनंती संजय कोकाटे यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading