रिपब्लिकन पक्षाच्या शहराध्यक्षपदी शैलेश चव्हाण यांची निवड

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या पुणे शहराध्यक्षपदी शैलेश चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . आज पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी यांची पक्ष कार्यालयात बैठक पार पडली .केंद्रीय मंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदासजी आठवले यांच्या आदेशाने व माजी शहराध्यक्ष संजय सोनवणे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने सर्वानुमते शैलेश चव्हाण यांची निवड करण्यात आली .

यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर ,माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे , प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव ,शहराध्यक्ष संजय सोनवणे ,परशुराम वाडेकर, अशोक कांबळे शहर संपर्क प्रमुख ,बसवराज गायकवाड कार्याध्यक्ष, पुणे शहर,शाम सदाफुले, सरचिटणिस) पुणे शहर ,परशुराम वाडेकर अध्यक्ष, प.महा युवक,आयुब शेख, अप्लसंख्यांक आघाडी, महाराष्ट्र ,बाबुराव घाडगे सरचिटणिस पुणे शहर
वसंत बनसोडे, वरिष्ठ उपाध्यक्ष, पुणे शहर,अॅड. मंदार जोशी, अध्यक्ष म. विद्यार्थी आघाडी,महिपाल वाघमारे, सरचिटणिस पुणे शहर,अशोक शिरोळे माजी अध्यक्ष, पुणे ,मोहन जगताप ,कालिदास गायकवाड, वरिष्ठ उपाध्यक्ष, पुणे शहर भगवान गायकवाड, वरीष्ठ उपाध्यक्ष पुणे,संगीताताई आठवले महिला अध्यक्ष पं महाराष्ट्र

Leave a Reply

%d bloggers like this: