Pune – कोरोनाचे नवीन 86 रुग्ण तर 69 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून शंभर च्या खाली आज रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 86नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 69रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 04हजार 099इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 94हजार 180इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 7रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 4तर पुणेमहापालिका हद्दीबाहेरील 3रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9074जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 845रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 131रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 4961 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
