Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एनसीबीचे वादग्रस्त पंच किरण गोसावीला आठ दिवसांची पोलिस कोठडी

पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते नवाब मलीक यांच्या आरोपा नंतर चर्चेत आलेले एनसीबीचे वादग्रस्त पंच किरण गोसावीला आज पुणे पोलिसांनी अटक केली. त्याला पुणे न्यालायात हजार केले असता आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.  नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप किरण गोसावीवर असून पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. यासह पुणे [पोलिसांनी आणखी तीन गुन्हे दाखल केले आहेत.

किरण गोसावी याच्यावर ठाणे,  कळवा,  अंधेरी,  पालघर आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.  किरण गोसावीने अनेक तरुणांना फसवले आहे. यामध्ये अनेकांची मोठी फसवणूक झाली आहे. त्याचा तपास करायचा असल्याने किरण गोसावीची 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी आज सरकारी वकिलांनी न्यायालयात केली होती.

दरम्यान, क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात सर्वात प्रथम किरण गोसावीचे नाव पंच म्हणून समोर आले होते. त्यानंतर काही दिवसातच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक यांनी गोसावी याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल असल्याचे उजेडात आणले होते. त्यानंतर नुकतेच गोसावी याचा ड्रायव्हर प्रभारक साईल याने गोसावी यांच्यावर शाहरूख खान कडे 25 कोटीची खंडणी मागीतल्याचे उघड केले आहे. या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या गोसावी याला पोलिसांना शरण येणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यापूर्वीच पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन गोसावीला अटक केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading