Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

PMPML – कर्मचाऱ्याची यंदाची दिवाळी गोड होणार

पुणे: पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी 25 कोटी रुपयांची गरज आहे. तसे मागणीपत्रही पीएमपीएमएल ने पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला दिले आहे. मात्र, प्रशासनाकडून त्यावर कुठलाही निर्णय घेतला नाही. दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर आली आहे. परंतु प्रशासनाने पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी प्रस्ताव स्थायी समितीकडे दिला नाही. तसेच स्थायी समितीने ही यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला नाही. अखेर आजच्या बैठकी मध्ये या संदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आला आणि त्याला तात्काळ मंजूरी देण्यात आली. अशी माहिती पत्रकार परिषदेत स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली आहे.

हेमंत रासने म्हणाले, त्यामुळे पीएमपीएमल कर्मचाऱ्याची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त बोनस जाहीर झाला असला तरी पीएमपीच्या दहा हजार कर्मचाऱ्यांच्या बोनस बाबत साधी चर्चा ही नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले होते. मात्र आता या कर्मचाऱ्यांना दिवाळीच बोनस देण्यासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. अशी माहिती आज पुण्यातील पत्रकार परिषदेत स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली आहे.

हेमंत रासने म्हणाले ,त्यासाठी 24 कोटी रुपये अॅडव्हान्स पोटी देण्यात येणार आहेत. पुणे महापालिका व शिक्षण मंडळाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळीचा बोनस व सानुग्रह अनुदान जाहीर झाले आहे. एवढेच न्हवे तर कोरोनामध्ये उत्तम कामगिरी बजावल्याने यंदाच्या वर्षी अतिरिक्त तीन हजार रुपये बक्षीस ही जाहीर करण्यात आले आहे. परंतु पीएमपीएमएल कर्मचार्यांबद्दल काहीच निर्णय झालेला नव्हता. पीएमपीएमएल सर्व सेवकांना दिवाळी बोसन देण्याचा प्रस्ताव नगरसेवक महेश वाबळे यांनी मांडला. या प्रस्तावाला सूचक म्हणून वर्षा तापकीर तर अनुमोदन मानसी देशपांडे यांनी दिले.

Leave a Reply