शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नये : भीम आर्मीची मागणी
पुणे : कोरोना काळातील आर्थिक अडचणींमुळे शालेय शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना दिवाळीपूर्व परीक्षेपासून वंचित ठेवू नये, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे.
काही शिक्षण संस्था याबाबत कठोर वागत असून त्याना रोखण्यात शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी हतबल ठरल्याने भीम आर्मी तर्फे २६ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता त्याना ‘हतबल शिक्षण आयुक्त पुरस्कार’ देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करणार आहे. भीम आर्मी तर्फे पुणे शहरअध्यक्ष तेजिंदर सिंह अलुवालिया, कार्याध्यक्ष मुकेश गायकवाड, सरचिटणीस प्रदीप कांबळे, महिला आघाडी अध्यक्ष सुनीता गायकवाड यांनी आज पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हे गांधीगिरी आंदोलन सेंट्रल बिल्डिंग मधील शिक्षण आयुक्त कार्यालयात करण्यात येणार आहे.
