Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNE

लोकजनशक्ती पार्टीच्या विविध नियुक्त्या जाहीर

पुणे : पुणे शहर लोकजनशक्ती पार्टीच्या विविध नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत. पार्टीच्या पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्षपदी सीताराम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वडगाव शेरी लेबर सेलच्या अध्यक्षपदी शाम पासी यांची तर उपाध्यक्षपडी दीपक खुडे यांची निवड झाली आहे. वडगाव शेरी मतदारसंघाच्या उपाध्यक्षपदी दीपक श्रीवास्तव आणि शेखर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. वडगाव शेरी विभाग सरचिटणीसपदी राजेश पिवाल यांची नियुक्ती करण्यात आली. लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांनी नियुक्ती पत्रे दिली. यावेळी (वडगाव शेरी मतदारसंघ- अध्यक्ष संतोष पिल्ले), (वडगाव शेरी-उपाध्यक्ष अतिष सोनवणे), (वडगाव शेरी-सरचिटणीस जीवन शिंदे)(पुणे शहर जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष- शुभम आल्हाट), (पुणे शहर जिल्हा युवक आघाडी उपाध्यक्ष- राहुल कुलकर्णी), कन्हैया पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading