पुणे जिल्हा अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत रमा शहापूरकर, श्रावणी देशमुख यांचे सनसनाटी विजय
पुणे : पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पुणे जिल्हा अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात रमा शहापूरकर, श्रावणी देशमुख या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत 17वर्षाखालील मुलींच्या गटात रमा शहापूरकरने दुसऱ्या मानांकित एंजल भाटियाचा 6-0 असा एकतर्फी पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. 14वर्षाखालील मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित श्रावणी देशमुखने तिसऱ्या मानांकित ह्रितिका कापलेचा 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. चौथ्या मानांकित आस्मि टिळेकरने पाचव्या मानांकित आरोही देशमुखचा टायब्रेकमध्ये 6-5(7-4) असा संघर्षपूर्ण पराभव करून आपले आव्हान कायम राखले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी: 14 वर्षाखालील मुले:
अभिराम निलाखे(1) वि.वि.स्वर्णीम येवलेकर(8) 6-1;
अर्जुन किर्तने(3) वि.वि.सनत कढले 6-0;
विश्वजीत सणस(4) वि.वि.तेज ओक 6-3;
मनन अगरवाल(5) वि.वि.अर्जुन वेल्लूरी 6-0;
अर्जुन किर्तने(3) वि.वि.सनत कढले 6-0;
विश्वजीत सणस(4) वि.वि.तेज ओक 6-3;
मनन अगरवाल(5) वि.वि.अर्जुन वेल्लूरी 6-0;
14वर्षाखालील मुली:
श्रावणी देशमुख(7) वि.वि.ह्रितिका कापले(3) 6-3;
आस्मि टिळेकर(4) वि.वि.आरोही देशमुख(5) 6-5(7-4);
रिशीता पाटील(6) वि.वि.श्रेया होनकन(12) 6-2;
17वर्षाखालील मुले:
साहिल तांबट(1) वि.वि.सार्थ बनसोडे(8) 6-2;
आर्यन कोटस्थाने(4) वि.वि.आर्यन चौधरी 6-1;
दक्ष अगरवाल(3) वि.वि.कनद मेहता 6-0;
जय दिक्षित(6) वि.वि.सूर्या राडे 6-0;
17वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
रिया भोसले(1) वि.वि.गार्गी फुले(4) 6-0;
रमा शहापूरकर वि.वि.एंजल भाटिया(2) 6-0.
