डॉ. राजेंद्रकुमार शर्मा यांना’आत्मनिर्भर भारत पुरस्कार’
पुणे : इंडियन अचिव्हर्स फोरमच्या (आयएएफ) वतीने आणि मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (एमईआयटीवाय), एमईआयटीवाय-स्टार्टअप हब, स्किल इंडिया व ‘व्होकल टू लोकल’ यांच्या सहकार्याने देण्यात येणारा ‘आत्मनिर्भर भारत पुरस्कार’ पुण्यातील स्पेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांना नुकताच प्रदान करण्यात आला. आगाऊ ऊर्जा साठवण यंत्र (ऍडव्हान्स एनर्जी स्टोरेज डिव्हाईस) निर्मितीसाठी हा पुरस्कार देण्यात आला असून, सुपर कॅपॅसिटरचे उत्पादन करणारी स्पेल टेक्नॉलॉजी ही भारतातील एकमेव कंपनी आहे. सी-मेट लिथियम-आयन बॅटरीचे आणि सोडियम आयन टेक्नॉलॉजीचे ते प्रवर्तक आहेत.
दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय आत्मनिर्भर भारत ई-परिषदेत (नॅशनल आत्मनिर्भर भारत ई-समिट) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या परिषदेसाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा प्रमुख पाहुण्या होत्या. ‘एमईआयटीवाय’चे वरिष्ठ संचालक डॉ. ए. के. गर्ग, जनरल (निवृत्त) डॉ. व्ही. के. सिंग, ‘डीएसटी’चे माजी सचिव प्रा. आशुतोष शर्मा, ‘आयएएफ’चे चीफ पॅट्रॉन आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे चिरंजीव सुनील शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय बनावटीच्या ऊर्जा साठवणूक उपकरणांची निर्मिती आम्ही करत आहो. लिथियम-आयऑन बॅटरीच्या निर्मितीसाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालय आणि स्पेल टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट) येथे सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन रिचार्जेबल बॅटरी टेक्नॉलॉजी उभारले आहे. तसेच या बॅटरी निर्मितीसाठी छोट्या उद्योगांना सहकार्य केले जात आहे. ऊर्जा बचतीचे तंत्रज्ञान विकसित करून आत्मनिर्भर भारताकडे टाकलेले हे एक पाऊल आहे. या कार्याबद्दल गौरव झाला, याचा आनंद आहे. ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी आणखी जोमाने काम करणार आहोत, असे डॉ. शर्मा यांनी सांगितले.
