Thursday, November 19, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरण – खळबळजनक; आर्यनला सोडण्यासाठी मागीतली 25 कोटींची खंडणी 

मुंबई : सध्या बॉलीवूडला टारगेट करून चौकशी होत असलेल्या क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात एक खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. या प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी साक्षीदार असलेल्या किरण गोसावीने शाहरुख खानकडे 25 कोटीची खंडणी मागीतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये एनसीबी अधिकारी समीर वाणखेडे देखील सहभागी असल्याचा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल याने  केला आहे.

प्रसार माध्यमांना प्रभाकर साईल यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “क्रुज पार्टी प्रकरण उजेडात येण्या आधी 2 ऑक्टोबरच्या रात्री व 3 ऑक्टोबरच्या पहाटे किरण गोसावीने शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली होती. त्यात 18 कोटींवर डील झाली. समीर वाणखेडे यांना विचारूनच ही डील झाली. या प्रकरणात पंच म्हणून माझी सही घेतली होती. मात्र तो कागद ब्लँक होता. रेडच्या दिवशी किरण गोसावीने त्यांना येलो गेटला बोलवले होते. तेव्हा साईलने गोसावीला फोनवर बोलताना ऐकले होते.”

इतके दिवस आपण कुठे होता? हे विचारले असटा सईलने सांगितले की, या प्रकरणात गोसावीचे नाव आल्याने मला भीती वाटली. माझ्या जीवाला धोका होता म्हणून मी माझ्या एका नातेवाईकांच्या घरी 10-12 दिवस राहिलो.

 

 

Leave a Reply