Thursday, July 30, 2026
BusinessLatest News

वॉर्डविझार्डच्या ‘जॉय ई- बाइक’तर्फे महाराष्ट्रातल्या पहिल्या इलेक्ट्रिक व्हिइकल एक्सपिरीयन्स सेंटरचे उद्घाटन

पुणे : ग्राहकांना खास अनुभव देण्यासाठी तसेच बाजारपेठेतील स्थान आणखी बळकट करण्यासाठी वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. (बीएसई कोड – 538970) या जॉय इ- बाइक दुचाकी इलेक्ट्रिक वाहनाचे उत्पादन करणाऱ्या आघाडीच्या ब्रँडने पुण्यात आपल्या पहिल्या एक्सपिरियन्स सेंटरचे उद्घाटन केले.

खास तयार करण्यात आलेले व कंपनीच्या मालकीचे हे केंद्र ग्राहकांना विक्री व सेवेशी संबंधित सर्व सुविधा पुरवण्यासाठी सुसज्ज असून त्याद्वारे संपूर्ण राज्यातील ब्रँडची व्याप्ती विस्तारण्याचा उद्देश आहे. या केंद्रामध्ये जॉय ई- बाइकच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स व मोटरसायकल्सची संपूर्ण श्रेणी पाहायला मिळेल. सध्या जॉय ई- बाइकच्या विस्तारित उत्पादन श्रेणीमध्ये १० मॉडेल्सचा समावेश आहे.

हा महत्त्वाचा प्रसंग महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पुणे मनपाचे माजी महापौर व नगरसेवक दीपक मानकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप आणि इतर वरिष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

इलेक्ट्रिक वाहने वाहतुकीचे भविष्य असून भारत या क्षेत्रात आघाडीवर राहून नेतृत्व करत आहे. विकासाचा हा वेग कायम राखण्यासाठी वॉर्डविझार्डने आपले नेटवर्क विस्तारण्याचे ठरवले आहे व त्याचबरोबर संभाव्य ग्राहकांना प्रत्यक्ष अनुभव देऊन उत्पादनाविषयी त्यांचा विश्वास वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.

वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि.च्या मुख्य ऑपरेटिंग अधिकारी शीतल भालेराव म्हणाल्या, हे एक्सपिरीयन्स सेंटर या क्षेत्रातील समीकरणे बदलण्यात महत्त्वाचे ठरेल. यामुळे राज्यातील प्रत्येक घरात इलेक्ट्रिक वाहनाला स्थान मिळेल. राज्यात आमचा विस्तार करण्यासाठी आवश्यक सहाय्य केल्याबद्दल आणि इलेक्ट्रिक वाहने संभाव्य ग्राहकांच्या अगदी जवळ पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभारी आहोत. संपूर्ण देशाला प्रदूषणमुक्त करण्याच्या सरकारच्या धोरणाशी आमचे हे प्रयत्न सुसंगत आहेत. ब्रँडसाठी महाराष्ट्र ही महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि वाहतुकीच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक दुचाकींकडे वळत असल्याचे आमचे निरीक्षण आहे. नव्या केंद्रामुळे आमचे अस्तित्व आणखी बळकच होईल व ग्राहकांना अनोखा अनुभव देण्याबरोबरच विक्री ते सेवेपर्यंतच्या सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. नजीकच्या भविष्यात ब्रँडने आणखी एक्सपिरीयन्स सेंटर्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नव्या एक्सपिरीयन्स सेंटर्समध्ये प्रशिक्षित विक्री अधिकारी नेमले जातील व ते ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार जॉय ई- बाइकचे मॉडेल निवडण्यास मदत करतील. हे अधिकारी इलेक्ट्रिक वाहतुकीविषयी जनजागृती करण्यासाठीही योगदान देतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading