पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा
पुणे : मोदी सरकारने 2-3 वर्षा पासून पेट्रोल -डिझेल व जीवनावश्यक वस्तू चे दर वाढवले आहेत.त्याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. आधीच कोरोना मुळे सामान्य जनता आर्थिक कोंडीचा फटका बसला आहे.त्यात मोदी सरकारने महागाई ही वाढवली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने वाढवलेल्या महागाई निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर तर्फे बैलगाडी मोर्चा काढत अनोखं आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन पुण्यात बालगंधर्व चौक ते झेड ब्रिज बैलगाडीवर मोर्चा काढत करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी मोदी सरकारने वाढवलेल्या महागाईचा निषेध राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर तर्फे व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष महेश रमेश हांडे,किशोर कांबळे ,राकेश कामठे,साकी गायकवाड, निलेश कांबळे,वैभव कोठुळे, शरद दबडे, मधुकर भगत , संदीप काळे, मंदार गोरेगावकर,अमोल ननावरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी चुलीवर भाकरी करत . आंदोलन केले होते. आज त्याच्या मोदी सरकारने पेट्रोल डिझेलचे दर वाढवले आहेत. पेट्रोल डिझेलचे दर हे दररोज 20 रुपयांनी वाढत आहेत. मोदी सरकारने महागाईवर अंकुश घालायला पाहिजे. नाहीतर एक दिवशी सामान्य जनतेला टू व्हीलर -फोर व्हीलर सोडून कामासाठी सायकल ने जावे लागेल. मोदी सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी करावे आम्ही सारखे आंदोलन करत आहोत. असे प्रशांत जगताप म्हणाले.
