Saturday, September 26, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

कोरोना लसीकरण : भारत जगात अव्वल; 100 कोटी डोसचा टप्पा केला पार

नवी दिल्ली : भारतात कोरोना लसींच्या कमतरतेपासून ते बोगस लसीकरकरणा पर्यंत अनेक समस्या निर्माण झाल्या. मात्र हे सर्व अडथळे पार करीत आज भारताने कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचा टप्पा पार केला आहे. लसीकरणाच्या बाबतीत भारत आता जगात पहिल्या क्रमांकावर आहे. या ऐतिहासिक क्षणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे आणि देशवासियांच्या सहकार्यामुळे ही गोष्ट साध्य झाल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. लसीच्या 100 कोटी डोसचा टप्पा पार झाल्या नंतर पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली येथील डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये जावून कोरोना वॉरीयर्सचे अभिनंदन केले.

दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात लसीकरण हा एकमेव पर्याय आपल्या सर्वांच्या हातात आहे. त्यामुळे जगभरात लसीकरण वेगाने सुरू आहे. भारतात कोरोनाच्या लसीकरणाला 16 जानेवारी 2021 रोजी सुरुवात झाली होती.  भारतातील अर्ध्याहून जास्त लोकसंख्येने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच लहान मुलांच्या लसीच्या चाचणीलाही मंजुरी मिळाली असल्याने येत्या काळात लसीकरणाच्या कार्यक्रमाला आणखी वेग येणार आहे.

…तरीही पात्र प्रौढांपैकी 25% लसीकरणा विरहितच 

भारताने कोरोना लसीकरणाचा 100 कोटी डोसचा टप्पा पार केला आहे. तरी देखील पात्र प्रौढांपैकी 25% लसीकरणविरहित असल्याची माहिती भारताच्या कोविड -19 टास्क फोर्सचे प्रमुख डॉ.व्ही.के. पॉल यांनी दिली. तसेच पात्र प्रौढ लोकसंख्येपैकी 74% लोकांना कमीतकमी एक डोस मिळाला आहे, तर 31% लोकांना पूर्णपणे लसीकरण केले गेले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading