Saturday, September 26, 2026
Latest NewsPUNE

व्यक्तीमत्व विकासाच्या खुल्या पाठशाळेत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा – सिद्धेश्वर लटपटे

पुणे: विद्यार्थ्यांच्या हितासाठी वर्षानुवर्षे निस्वार्थीपणे कार्य करणारी जगातील सर्वात मोठी संघटना म्हणून ओळखली जाणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आयोजित केलेल्या सदस्यता अभियानात हजारो विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या हितासाठी अहोरात्र कार्य करत असते. त्यांच्या हक्काच्या शिक्षणासाठी सतत लढत असते. अभाविप महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने ११ ऑक्टोबर २०२१ पासून सदस्यता अभियानास सुरूवात केली असता, आतापर्यंत ५४ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी तसेच प्राध्यापकांनी यात आपली सदस्यता नोंदवली आहे. मागील दोन वर्षे संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना, शाळा, महाविद्यालय ऑफलाईन शिक्षणाकरिता बंद ठेवण्यात आले होते. परंतु, आत्ताची परिस्थिती पाहता, महाविद्यालय पुन्हा सुरू करण्यात आले. तब्बल दोन वर्षानंतर महाविद्यालयात नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांनी एवढ्या उत्साहाने अभाविप वर विश्वास दाखवला तो नक्कीच मोलाचा आहे. आणि विद्यार्थ्यांच्या ह्याच विश्वासाला सतत डोळ्यासमोर ठेवून अभाविप त्यांच्या हितात कार्य करत राहिल असे आश्वासन अभाविप ने विद्यार्थ्यांना केले.

आज दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजी, सकाळी ७ वाजल्यापासून अभाविपचे कार्यकर्ते पुणे शहरातील फर्ग्युसन महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय, सिंहगड महाविद्यालय, भारती विद्यापीठ परिसर अशा विविध महाविद्यालयांत सदस्यता अभियान राबवत आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकासाच्या या खुल्या पाठशाळेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री श्री. सिद्धेश्वर लटपटे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading