महामारीच्या काळात घडलेल्या हद्ययस्पर्शी कथा सांगणारा म्युझिक व्हिडिओ – अधुरी कहानी
या महामारीच्या काळात तुटलेली मने, प्रेमींचे विभक्त होणे, आणि नात्यांमधील दुरावा यांसारख्या मार्मिक घटनांना समर्पित,’अधुरी कहानी’ हा तीन मिनिटांचा म्यूजिक व्हिडिओ आहे, जो साथीच्या आजाराच्या काळातील दु: ख आणि वेदनांना अत्यंत मार्मीकरीत्या मांडतो. हा म्युझिक व्हिडिओ झी म्युझिकने लाँच केला आहे. हा म्युझिक व्हिडिओ इंडियन आयडॉल सीझन वनचे फायनलिस्ट आणि ख्यातनाम संगीतकार हरीश मोयल, यांनी लिहिले आहे. व मुंबईस्थित विख्यात प्रॉडक्शन हाऊस राजलक्ष्मी क्रिएशन्सचे सुनील जे. जैन ज्यांनी 30 पेक्षा जास्त बॉलीवूड आणि टॉलीवुड चित्रपटांमध्ये आपली प्रतिभा दाखवली आहे त्यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.
व्हिडीओ अभिनेत्री कृषेका पटेलवर चित्रित करण्यात आला आहे ज्यांनी प्रेमींच्या हृदयाचे दुख्ख सुंदररित्या मांडले आहे. कृषेकाचा हा पहिला प्रोजेक्ट असुन तीने प्रसिद्ध न्यूयॉर्क फिल्म एकेडमी मधुन अभिनयाचे धडे घेतले आहेत. तिला फॅशन आणि पॅजेन्ट शोचा मोठा अनुभव आहे. तिने चॅनल व्ही वर द बड्डी प्रोजेक्टसह आपले काम सुरू केले आणि त्यानंतर ती प्रकाशझोतात आली. अनिरुद्ध धूत आणि सुनील जे. जैन द्वारे संयुक्तपणे निर्मित या म्युझिक व्हिडिओ मध्ये एक अशी प्रेमकथा दाखवली आहे जी शेवटी अपूर्ण राहते, आणि त्यानंतर पहावयास मिळतो दु: खांचा कोसळलेला डोंगर. कला संरक्षक आणि स्वभावाने संगीत प्रेमी असलेले धूत म्हणतो, “संगीताद्वारे भावना व्यक्त करण्याचा मार्ग अनोखा आहे.
महामारीच्या काळात मुख्य प्रवाहातील माध्यमांनी अनेक मुद्द्यांची दखल घेतली, परंतु प्रेमकथा विसरल्या गेल्या. लोक चालत राहीले, काही वेगळे झाले आणि काही तुटन गेले. या व्हिडिओ अल्बमचा उद्देश आहे त्यांच्या भावनांचे सार मांडणे. जगभरात ३००० हून अधिक लाइव्ह शो करणारे मोयल म्हणतात, “व्हिडिओसाठी लिहिणे हा एक मोठा अनुभव होता. मी दिग्दर्शक सुनील जे. जैन यांचा आभारी आहे त्यांनी ३ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये कलात्मक दृष्ट्या दुःखांची रूपरेषा मांडली आहे. मुंबईच्या मढ आयलॅंडवर मुसळधार पावसात व्हिडियो 21 दिवसात पूर्ण झाला. गीत, सेटिंग, कलाकार, सिनेमॅटोग्राफी ते संगीतापर्यंत – प्रत्येक घटक थीमला अनुकूल आहे.
