Saturday, September 26, 2026
Latest NewsPUNE

…अन् पुन्हा रंगली सप्तसुरांची संगीत मैफल 

पुणे: क्या हुवा तेरा वादा… ये मेरा प्रेम पत्र पढकर… आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर अशा सदाबाहर हिंदी गीतांची मैफल पुन्हा एकदा सजली. कोरोना महामारीमुळे घरातूनच संगीत मैफल ऐकणाऱ्या पुणेकर रसिक प्रक्षेकांना आज पुन्हा एकदा सुरेल गीतांच्या मैफलीचा प्रत्यक्ष आस्वाद घेता आला. दोन वर्षांनी रंगलेलेल्या या गिटार मास्टरपीस गीतांच्या पेशकशीला पुणेकरांनी भरभरून दाद दिली.
पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच आयोजित सेव्हन नोटस एंटरटेन्मेट प्रस्तुत छेडो दिल के तार सदाबहार संगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयोजक किशोर सरपोतदार, समन्वयक अजित कुमठेकर, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, उपेंद्र भट, विजय केळकर, विवेक परांजपे, माणिक बजाज, इक्बाल दरबार, पप्पीशकुमार ललगूनकर, पुष्पा चौधरी, रुपाली पाथरे, भाई ताम्हाणे, प्राजक्ता कोळपकर, दिलीप राऊत, योगीता गवस, प्रसाद कात्रे, संतोष चोरडिया, मनीषा निश्चल, अनघा राजवाडे, सोनाली गोडबोले, जितेंद्र भरुक, योगिता बडवे असे अनेक दिग्गज कार्यक्रमाला उपस्थित होते.प्रसिद्ध गिटारीस्ट मुकेश देढिया, गायक आकाश सोलंकी, तेजस्विनी पाहूजा, संजय मरळ, सतीश मराठे या कलाकारांनी गीतांचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाची सुरूवात सोलवा साल या चित्रपटातील है अपना दिल तो आवारा या गीताने झाली. त्यानंतर ये रात भीगी भीगी पल पल दिल के पास, सारा प्यार तुम्हारा या हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील गीतांचा सुरेल प्रवास उलगडला. तर मुकेश देढिया यांच्या आज कल तेरे मेरे चर्चे हर जबान पर क्या खुब लगती हो, अॅन इव्हनींग इन पॅरीस या गिटारवर सादर केलेल्या या गीतांनी रसिकांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे निवेदन आकाश सोलंकी यांनी केले. अजित कुमठेकर यांनी स्वागत केले, किशोर सरपोतदार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading