Monday, September 28, 2026
BusinessLatest NewsPUNE

प्राईड वर्ल्ड सिटीमध्ये ‘वेलिंग्टन’ हा निवासी प्रकल्प सादर

पुणे : पुणे, मुंबई व बंगळूरू यांसारख्या शहरात अनेकविध व्यापारी व निवासी संकुलांची उभारणी करणाऱ्या प्राईड ग्रुपच्या वतीने धानोरी- लोहगाव रस्त्यांवरील च-होली येथे सुमारे ४०० एकर परिसरात साकारात असलेल्या प्राईड वर्ल्ड सिटी येथे वेलिंग्टन हे नवीन प्रीमिअम निवासी संकुल निर्माण करत असल्सायाची घोषणा करण्यात आली आहे. प्राईड वर्ल्ड सिटीमध्ये याआधी ३ हजार पेक्षा जास्त कुटुंब आनंदाने राहत आहेत. सदर प्रकल्पाचा P52100031008 हा महारेरा नोंदणी क्रमांक आहे.

‘वेलिंग्टन’ हे निवासी संकुल प्राईड वर्ल्ड सिटीमधील एकूण १२ एकर जागेवर आकार घेणार असून यामध्ये २, ३, ४ बीएचके प्रमाणे सुमारे दोन हजार सदनिका बुकिंग साठी उपलब्ध असतील. विशेष म्हणजे सदर प्रकल्पात ३ बीएचके सदनिका या ३ बीएचके एल (L) व ३ बीएचके एक्सएल (XL) अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहेत. २ व ३ बीएचके सदनिकांच्या किंमती या रुपये ६१ ते ९१ लाखांदरम्यान असणार असून त्यांचा आकार हा ७८० स्केअर फूट ते ११५७ स्केअर फूट या दरम्यान असेल.

याबद्दल माहिती देताना प्राईड ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद जैन म्हणाले, “कोरोनाचा सामना करताना जगभरात वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून काम करण्याच्या संस्कृतीने मोठ्या प्रमाणात जोर धरला आहे. नजीकच्या भविष्यातही ही संकल्पना वाढेल अशी चिन्हे आहेत. हेच लक्षात घेत वेलिंग्टन प्रकल्पात आम्ही घरातून काम करता येण्याच्या दृष्टीने प्रत्येक सदनिका डिझाईन केली आहे. यादृष्टीने आणखी एक महत्वाची बाब म्हणजे सदर प्रकल्पात आंम्ही को वर्किंग लाउंजची देखील निर्मिती करणार आहोत.”

याशिवाय प्रकल्त ६ एकर इतक्या विस्तीर्ण जागेत पोडिअम अॅमेनिटीज, सदनिकेत हवा व प्रकाश खेळता राहावा या दृष्टीने थ्री साईड ओपन अपार्टमेंट रचना सोबतच ११० हून अधिक विचारपूर्वक उभारण्यात आलेल्या सुविधा जसे भाजी आणि किरणाची दुकाने, पाळणाघर, सलून, स्पा, थीएटर इस्त्यादी यांचा समावेश असणार आहे. या प्रकल्पाला बजाज हाऊसिंग फायनान्स, गोदरेज हाऊसिंग फायनान्स, एसबीआय बँक, अॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक यांसारख्या महत्त्वाच्या बँक व आर्थिक संस्थानी गृहकर्जासाठी परवानगी दिली असल्याची माहितीही जैन यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading