fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

डॉ. भारती पवार यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आण्विक निदान व संशोधन केंद्रास भेट

पुणे :”कोविड काळात कोविड सॅम्पल टेस्टिंग करण्याचे काम करणारे तुम्ही खरे कोविड योद्धा आहात..!” असे म्हणत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आण्विक निदान संशोधन केंद्रात स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महत्वकांक्षी प्रकल्पापैकी एक असणाऱ्या आण्विक निदान संशोधन केंद्राला भेट देत ‘कोविड सॅम्पल टेस्टिंग’ प्रकल्पाची ची पहाणी डॉ. भारती पवार यांनी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाची माहिती घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, अधिसभा सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, बागेश्री मंठाळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुधाकर जाधवर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आण्विक निदान संशोधन केंद्राच्या नोडल अधिकारी डॉ. करिश्मा परदेसी यांनी यावेळी आयसरमधील प्राध्यापकांच्या प्रशिक्षणापासून सुरू झालेल्या केंद्रापासून ते लेव्हल थ्री ची सुसज्ज प्रयोगशाळा होण्यापर्यंतचा प्रवास सांगितला. यावेळी डॉ.नितीन करमळकर यांनी विद्यापीठाने कोविड काळात केलेल्या अनेक प्रकल्पांची माहिती दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading