Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

महागाई, इंधन दरवाढ, गुन्हेगारी विरोधात भारिप बहुजन महासंघाचे आंदोलन

पुणे : वाढती महागाई, इंधन दरवाढ, गुन्हेगारी, जुगार, सट्टेबाजी, महिला अत्याचार, काळेधंदे बंद व्हावेत म्हणून  स्वारगेट चौक ते स्वारगेट सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघ यांच्या वतीने धडक मोर्चा नेहून तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी भरत शिंदे उपाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ पुणे, ऍड. किरण कदम माजी शहर अध्यक्ष तसेच कायदेशीर सल्लागार भारिप तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी या प्रसंगी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
 हातात बॅनर, झेंडे आणि घोषणाबाजी करून स्वारगेट सहाय्यक पोलीस आयुक्त  परिसर दणाणून सोडला. पुणे शहरातील स्वारगेट मार्केटयार्ड परिसरात मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी, स्त्री अत्याचार, काळेधंदे, गुन्हेगारीला आळा घालावा आंदोलन करण्यात आले.
भरत शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की, पुणे शहरातील स्वारगेट मार्केटयार्ड परिसरात काळेधंदे, सट्टा, जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी अनघा देशपांडे यांची शासकिय स्तरावर चौकशी होवून त्यांचेवर कठोर कारवाई करावी तसेच व स्वारगेट सहाय्यक पोलीस आयुक्त  सुषमा चव्हाण यांच्या हकालपट्टी करून स्वारगेट मार्केटयार्ड हद्दीमध्ये असणारे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे. अशी मागणी यावेळी करण्यात आली.
स्वारगेट सहाय्यक पोलीस आयुक्त ऑफिसच्या हद्दीमध्ये शेकडो अवैध बेकायदेशीर धंदे मटका, जुगार , गावठी दारु , हातभट्टीची दारु , चरस , पत्त्याचा क्लब , सोरट , लॉटरी अनेक मसाज पार्लरमध्ये गाजांचे धंदे , पान टपरीवर बेकायदेशीर गुटखा विक्री , स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड शेजारी रात्री उशीरापर्यंत अंडाभुर्जीच्या बेकायदेशीर हातगाडया सुरु असतात , असंख्य लॉज व इतर अनेक अनाधिकृत धंदे स्वारगेटच्या सहाय्यक पोलीस आयुक्त चव्हाण यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. स्वारगेट एसीपी सुषमा चव्हाण आणि मार्केट यार्ड पी आय अनघा देशपांडे या दोघींना तात्काळ निलंबित करावे अशी घणाघाती टीका यावेळी ऍड. किरण कदम यांनी केली.
स्वारगेटच्या एसीपी सुषमा चव्हाण यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला मात्र त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. त्या म्हणाल्या की जर माझ्या हद्दीत काळेधंदे सुरू असतील तर माझे वरिष्ठ अधिकारी माझ्यावर कारवाई करतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading