जनशक्ती शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ऊस वाहतुकीच्या संपाला संजय कोकाटे यांचा पाठिंबा
माढा :सध्या सर्वच साखर कारखान्यांची गाळप सुरू करण्याची लगबग सुरू झाली आहे ऊस वाहतूकदार शेतकर्यांनी आपापले वाहन सज्ज करून ऊसतोडणी कामगार घेऊन येण्याची लगबग सुरू आहे बरेच वाहतूकदार लेबर घेऊनसुद्धा आलेले आहेत तरीसुद्धा ऊस वाहतूक दरवाढ किती देणार? हे कुठल्याही साखर कारखान्यांनी जाहीर केलेले नाही. किंवा उसाचा पहिला हप्ता किती देणार ? एकरकमी देणार का ? टप्प्या टप्प्याने देणार तर किती दिवसांत देणार ? पहिला हप्ता किती देणार हे जाहीर केलेले नाही उलट ऊस वाहतूकदार मालका समोर पर्याय नाही त्यांना काहीही दिले नाही तरी ते वाहतूक करणारच अशा भ्रमात कारखानदार असल्यामुळे ते वाढ जाहीर करत नाहीत त्यामुळे आंदोलनकर्त्या संघटनांना संप पुकारण्याशिवाय कुठलाही पर्यायच राहिला नाही आणि त्यांनी तो पुकारला अशी माहिती शिवसेना माढा विधानसभा मतदारसंघ चे माजी आमदार संजय कोकाटे यांनी माहिती दिली.
आंदोलन करणाऱ्या संघटनेचा किंवा माझा यामध्ये कुठलाही फायदा नसताना तुमचा न्याय्य हक्कासाठी आम्ही सर्व जण लढत असताना आपण हिरहिरीने यामध्ये भाग घेऊन लढा यशस्वी करायचा आहे व आपण सर्वजण तो लढा यशस्वी करणारच आहे येणार्या काळात अनेक संघटना, पक्ष, व्यक्ती आपल्याला पाठिंबा देणार आहेत अशी माहिती संजय कोकाटे यांनी दिली.
