घोरपडी गाव व प्रभाग क्रमांक २१ मधील नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवेचे लोकार्पण
पुणे:घोरपडी गाव व प्रभाग क्रमांक २१ मधील नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवेचा लोकार्पण कार्यक्रम पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते पार पडला. या मोफत रुग्णवाहिका सेवेमुळे पुणे,घोरपडी व प्रभाग क्र.२१ मधील सर्व गोरगरीब नागरीकांना फायदा होणार आहे. सदर कार्यक्रम माजी आमदार मोहन जोशी, नगरसेवक अविनाश बागवे, नगरसेविका संगीता पवार, नगरसेवक राजेंद्र शिरसाठ, छाया जाधव, डॉ. विजय माने, अविनाश कवडे, रविअण्णा दांडेली, हाजी नासीरखान, प्रकाश कवडे, मुकेश गुंड, दत्तात्रय कवडे, सुरेश गव्हाने, प्रेम परदेशी, मोहन परदेशी, काका पवार, क्लेमेंट लाजरस, मनोज बाथम या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
