Thursday, July 30, 2026
Latest NewsPUNE

बोधिसत्व सहकारी रुग्णालयाचे उदघाटन व आरोग्य शिबीर संपन्न

पुणे : विद्यानगर येथील पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यू .कॉलेज येथे बोधिसत्व सहकारी रुग्णालय मर्यादित ,पुणे यांच्या माध्यमातून ओ पी डी सुरू करण्यात आली असून त्यानिमित्ताने निःशुल्क आरोग्य तपासणी केंद्राचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त  अनिल कवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी चलवादी शिक्षण संस्थाचे अध्यक्ष हुलगेश चलवादी , डॉ आनंद जोगदंड, नारायण आघाव , मधूकांत गरड ,डॉ .पी टी.गायकवाड ,मुख्य प्रवर्तक डॉ मोरेश्वर सुखदेवें ,ऍड.रेणुका चलवादी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आनुभवी व वैद्यकीय तज्ञ डॉक्टर यांचेकडून गरजूंची निःशुल्क आरोग्य तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले .याचा लाभ परिसरातील अनेकांनी घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माजी अति. सहकार आयुक्त डॉ आनंद जोगदंड यांनी रुग्णालयाची वाटचाल कशा पद्धतीने चालणार आहे याची मांडणी केली . पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने अनिल कवडे साहेब व इतर मान्यवरांचा महात्मा फुले पगडी ,शाल पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन हुलगेश चलवादी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .याप्रसंगी पोपटराव वाघमारे ,उत्तरेश्वर लोंढे ,चंद्रकांत शिंदे ,राजाभाऊ काळबांडे ,डॉ विजयकुमार माने ,डॉ उज्वला बॅंड ,डॉ, सुरेंद्र बेंडे ,अनिल सुर्यवंशी ,डॉ सारीपुत नवघरे ,आर आर धनविजय ,डॉ समीर आगळे ,प्रा गाणार ,दीपक म्हस्के ,यांनी नियोजन केले. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ संजय खरात यांनी केले तर आभार प्रा.गौतम मगरे यांनी मानले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading